Breaking


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अमित शहा यांची शरद पवार यांनी घेतली भेट !


नवी दिल्ली ( वृतसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुलै मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मंगळवार (दि.३ ऑगस्ट ) रोजी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र या भेटीची माहिती जाहीर केली नसली तरी दस्तुरखुद्द स्वतः शरद पवार यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भेटीचे कारण गुलदस्त्यात न ठेवता स्पष्ट केले आहे.


शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात देशातील साखर उद्योगाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच देशातील साखर उत्पादन, साखर उद्योगाची देशातील स्थिती. त्याचप्रमाणे देशात दरवर्षी साखरेचे होणारे वाढीव उत्पादन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने अमित शहा यांना एक निवेदन देण्यात आले. तेच निवेदन शरद पवार यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

संपादन - रवींद्र कोल्हे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा