Breaking


घोडेगाव : शिणोली येथे आदिवासी दिनानिमित्त विविध कला सादर


घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील शिणोली येथील धारेचीवाडी येथे ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी ठाकर जमातीच्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य सादर केले.धारेचीवाडी येथे दरवर्षी अश्याच उत्साहात जागतिक आदिवासी दिन येथे एक सण म्हणून साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे पारंपरिक पोशाख परिधान केले जातात. पारंपरिक गीत सादर केली जातात. पारंपरिक आदिवासी नृत्य देखील केली जातात. याही वर्षी या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या लोककलांचे संवर्धन करून अनेक आदिवासी लोकनृत्य सादर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा