Breaking


मोठी बातमी : अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा रद्द, हायकोर्टाचा निर्णय


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावर बॉम्बे हायकोर्टाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तसेच दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहे.


कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी सीईटी पूर्णपणे एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी अधिसूचना २८ मे रोजी काढण्यात आली होती. आज निकाल देताना हायकोर्टाने ही अधिसूचना रद्द केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा