Breakingरानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा निर्णय अखेर रद्द


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूट मधील अभ्यासक्रमाच्या स्थलांतराच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.


गेल्या काही दिवसांपासून रानडे इन्स्टिट्यूट मधील अभ्यासक्रमाच्या स्थलांतरावरून वाद निर्माण झाला होता. विद्यापीठाच्या स्थलांतराच्या निर्णयाला विविध संघटनांनी विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिटय़ूटला भेट दिली होती. 


त्यावेळी मंत्री सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे पदाधिकारी, अन्य उपस्थित पत्रकार आणि माजी विद्यार्थी संघटनांशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी रानडे इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रमाच्या स्थलांतरणाचा, तसेच विलिनीकरणाचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये चालणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे स्थलांतर तसेच संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यापीठातील संज्ञापन आणि माध्यम अभ्यास विभागात विलीनीकरण करून संज्ञापन, पत्रकारिता आणि माध्यम अभ्यास विभाग हा नवा विभाग निर्माण करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा