Breaking
माहिती दिली अन् ....त्यामुळे नितीन लांडगे यांची येरवडा कारागृहात रवानगी !


पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील  स्थायी समितीचे अध्यक्ष अँड.नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांनी होर्डिंग"ची वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितल्याने लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई संदर्भात आरोपी लांडगे यांनी अंतरिम जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात खोटी माहिती दिली.


हे न्यायालयात स्पष्ट झाल्याने न्यायालयाने अँड.लांडगे यांचा जामीन अर्ज सपशेल फेटाळला. अंतरिम जामीन ना मंजूर झाल्याने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


स्थायी समितीचे अध्यक्ष अँड.नितीन  लांडगे यांच्यावर लाचलुतपत प्रतिबंधक ( ACB ) विभागाने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने अंतरिम जामीन मिळावा म्हणून आज्जीचे म्हणजेच आईच्या आईचे दुःखद निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, या कारणास्तव न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर करून गुरुवार दि.२६ ऑगस्ट पर्यंत जामीन मंजूर देण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र असं असलं तरी आरोपी अँड.लांडगे यांच्या आजी नव्हे तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे. अशी माहिती पोलिसांनी लाचलुतपत प्रतिबंधक विभाग न्यायालयात दिली.त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा असा युक्तिवाद सुनावणी दरम्यान सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडतांना केला.


स्थायी समितीचे अध्यक्ष अँड.नितीन लांडगे यांचे स्वीय सहाय्य सचिव (पीए) ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय५६,रा.भोसरी,पुणे), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा.भिम नगर पिंपरी,पुणे), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा.थेरगाव,वाकड,पुणे) आणि लिफिक विजय शंभुलाल चावरिया (रा.धर्मराज नगर) यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

लांडगे यांनी या पूर्वी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. इतर आरोपींनीही जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. या सर्व आरोपींच्या अर्जांवर शुक्रवार ( दि.२७ ऑगस्ट ) रोजी सुनावणी होणार आहे.


तक्रारदार फिर्यादी जाहिरात ठेकेदार आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. सन २०१९ व सन २०२० या वर्षीच्या निविदा मंजूरही करण्यात आल्या होत्या. मात्र वर्क ऑर्डर काढण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार याने स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगे यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी बोली रकमेच्या तीन टक्के या प्रमाणे दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपये देण्याचे ठरले. एक लाख १८ हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले. एक लाख १८ हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यानंतर ACB ने पाचही आरोपींना अटक केली. 


लचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव, अप्पर अधिक्षक सुहास नाडगौडा, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सीमा मेहंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा