Breaking
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर दिव्यांगांचे लक्षवेधी उपोषण करत तीव्र आंदोलन


पुणे
 : पुणे विभागीय आयुक्त कार्यालया पुणे  येथील कार्यालय येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनच्या वतीने लक्षवेधी उपोषण करत तीव्र आंदोलन करण्यात आले.


यावेळी पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जिल्ह्यामध्ये शासन निर्णय 2016 ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच दिव्यांगाना सरकारी योजनांचा लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, यासह अन्य  मागण्या करण्यात आल्या.
 
या वेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, श्रीमती सुरेखा ढवळे, कोल्हापूर चे देवदत्त माने, सातारचे अमोल कारंडे, सांगलीचे रामदास कोळी, संजिवनी बारगुळे, नयनभाऊ पुजारी रूग्ण सेवक चे संतोष साठे, जुन्नर तालुका रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, सौरभ मातेले, फरहान अली मीर, ज्ञानदेव  बांगर, ओमकार शिंदे, शंकर सोनवणे, हिराबाई बांगर, नंदा बोचटू, जिवन टोपे, अविनाश लबडे, शांताराम बांगर, रमेश शिंदे व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा