Breaking


जालना : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा तहसीलदारांना घेराव !


जालना : आज घनसावंगी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकरी कामगारांच्या स्थनिक न्याय मागण्यासाठी निदर्शने आणि ठिय्या आंदोलन करून नायब तहसीलदार राखे यांना घेराव घालण्यात आला.


पीक विमा, पीक कर्ज, अति पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने करावे, रेशन चे प्रश्न सोडवण्यासाठी गावोगावी कॅम्प घ्यावेत, रोजगार हमी योजनेतून बोगस कामे होतात त्यांची चौकशी करा आणि संबधित विभागातील यंत्रणांवर योग्य ती कार्यवाही करा, निराधारांचे थकीत पेंशन वाटप करा, प्रलंबित अर्ज निकाली काढावेत आदी मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आले.


मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी कॉम्रेड गोविंद आर्दड, आसाराम आर्दड, बाळराजे आर्दड, सोनू भोरे, आंसिराम गनगे, कुलदीप आर्दड, अजित पंडित,  मुबारखक पठाण व अन्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा