Breaking


जुन्नर : विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत ८ वर्षाची चिमुकली भाजली


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील केळी या गावात विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत ८ वर्षाची चिमुकली भाजून जखमी झाल्याची घटना घडली.


सविस्तर माहिती अशी की, केळी ता. जुन्नर येथील चैताली अशोक लांडे वय ८ वर्षे ही रविवार (दि. ८) आजी समवेत शेतात जात असताना विज वाहक तारांच्या घर्षणामुळे आग लागली. जाळ होऊन आगीचे लोळ खाली पडले. यात चैताली भाजली आहे. तिच्यावर जुन्नर येथील मोकाशी जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेत चैतालीच्या पाठीचा तसेच हाताचा भाग भाजला आहे. सुमारे ३० टक्के अंग भाजले असल्याचे सांगण्यात आले.


या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य काळू गागरे आणि ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागास कळवले. त्यानंतर आपटाळे विभागाचे सहाय्यक अभियंता विकास गावंडे, वायरमन सचिन नवले व काळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 


यावेळी बोलताना काळू गागरे म्हणाले, सबंधित मुलीला आवश्यक मदत मिळण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. निश्चितपणे मुलीला मदत मिळून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.


अधिक वाचा:

मोठी बातमी : अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा रद्द करण्याचा हायकोर्टाचा निर्णय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा