Breaking
जुन्नर : देवराम लांडे यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल


जुन्नर / रफिक शेख : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान सदस्य देवराम लांडे यांनी कोरोनाचे नियम मोडल्याचे समोर आले आहे.


लांडे यांनी आपल्या दोन मुलांचा शाही विविह जुन्नर मध्ये आयोजित केला. या लग्न सोहळ्यामध्ये १८०० ते २००० लोकांची गर्दी होती. 


या प्रकरणी लांडे यांच्यासोबत नवरदेव, कार्यालय मालक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या लग्न सोहळ्या करीता जुन्नर येथील आमदार अतुल बेनके यांच्यासह ठाणे येथील आमदार, आजी - माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा