Breaking
जुन्नर : इंगळून येथे भव्य रोजगार मेळावा, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवहान !


जुन्नर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर मागेल त्याला काम मिळाला पाहिजे, यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने इंगळून (ता.जुन्नर) येथे २५ ऑगस्ट २०२१ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या मेळाव्यास आंबेगाव तालुक्यात गाव पातळीवर मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करणारे फलोदे गावचे माजी सरपंच अशोक पेकारी मार्गदर्शन करणार आहे. तर आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा