Breaking
जुन्नर : कुकडी पट्ट्यात बिबट्याने केला शेतकऱ्याचा पाठलाग, प्रसंगावधान राखल्याने शेतकरी बचावला

आळेफाटा / रवींद्र कोल्हे : वडगांव-आंनद शिवारातील चौरेमळा येथील शेतकरी वाळुंज हे मंगळवार (दि.२४ ऑगस्ट) रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास येथील एका शेतकऱ्याचा बिबट्याने अक्षरशः पाठलाग केला. मात्र बिबट्याची चाहूल लागताच शेतकरी बाळासाहेब सावळेराम वाळुंज यांनी प्रसंगावधान राखून आपली सुटका केली आणि यातून बचावले. याबाबत अधिक माहिती अशी की, वडगांव आनंद येथील शेतकरी बाळासाहेब वाळुंज हे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोठ्यात दूध (धारा) काढण्यासाठी जात असतांना समोर बिबट्या दिसला बिबट्याने शेतकरी वाळुंज यांना समोर पाहताच बिबट्याने झडप घालण्यासाठी तयारी करत पाठलाग सुरू केला. मात्र न घाबरता प्रसंगावधान राखून त्यांनी आरडा ओरडा केला करत पळू लागले. गोठ्यापासून साधारण दोनशे मीटर अंतरावर गेल्यावर बिबट्याने पिंपळगाव जोगे कालव्याच्या बाजूला धूम ठोकली. वाळुंज यांनी प्रसंगावधान राखल्याने वाळुंज बचावले.


हे पण पहा ! जुन्नर : मोक्काच्या दोन गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेलल्या कुविख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईलने पाठलाग करुन ठोकल्या बेड्या !


या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या पूर्वीही बिबट्याने या शिवारात एकाचा पाठलाग केला होता. त्यावेळीही बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत आहे. ऊस मळे ही बिबट्यांची घरे बनत आहे.


याच पट्ट्यातील आळे येथील आरगडे मळा येथील शिवारात बुधवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तरुणाच्या हातात दोर असलेल्या बकऱ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर काही अंतरावर शेळ्यांच्या करडांचा पडशा पडला होता. ही घटना ताजी असतांनाच आज पाठलाग केल्याने बिबट्याच्या दहशतीने वडगांव आंनद आणि शिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत.


हे पण पहा ! पुणे: कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी, भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा