Breaking


जुन्नर : सुकाळवेढे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील सुकाळवेढे या गावात दि.९ रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. 


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा, राघोजी भांगरे या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


आदिवासी परंपरा, चालीरीती तसेच आदिवासींसामोरील उभी असलेली आव्हाने याबाबत कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक ढोल व लेजमाच्या तालावर फेर धरला. 


या कार्यक्रमाला सरपंच सुशिला ढेंगळे, ग्रामपंचायत सदस्य लता घोटकर, वरसुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय गवारी, अँड.विठ्ठल ढेंगळे, ग्रामसेवक मुठे भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते अशोक बोचरे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ ढेंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव ढेंगळे, माजी उपसरपंच जानकू ढेंगळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा