Breaking


जुन्नर : पेसा ग्रामपंचायतीमध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करा - गट विकास अधिकारी


जुन्नर पेसा ग्रामपंचायतीमध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करा, असे पत्र सर्व पेसा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पंचायत समिती जुन्नर चे गट विकास अधिकारी यांनी सूचित केले आहे.


संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारत, चीन, अमेरिका, रुस, फ्रांस, इंग्लंड असे एकूण १९२ देश सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे युग असे म्हणतो. त्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगात आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासभेतील सर्व सहभागी देशांना केली.

संयुक्त राष्ट्र संघाचा हेतु हा आहे की, आदिवासी संस्कृती, परंपरेचा आदर अन्य समुदायाने करावा, आदिवासींचे हक्क व अधिकारांचे मिळावे व त्याचे संरक्षण व्हावे. जागतिक आदिवासी दिन उत्सव म्हणून साजरा न करता हक्कांच्या मागणीसाठीचा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. 'उलगुलान' चा आवाज बुलंद करण्याचा हा दिवस आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रेरणेनेच १९९४-२००५ हे 'आदिवासी दशक' म्हणून साजरा करण्यात आले. तरी सर्व समाजातील नागरिकांना आदिवासी दिन साजरा करण्याची गरज आहे. यातूनच सामाजिक सलोख्या दृढ होण्यास मदत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा