Breaking
जुन्नर : कोल्हे मळ्यातील बाधित शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट !


मुंबई / रवींद्र कोल्हे : पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांची जुन्नर विधानसभा मतदार संघ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विषयांवर, विषेशतः कोल्हेमळा येथील बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा झाली.


मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा संघटनेचे प्रतिनिधी, तमाशा कलावंत संघटनेचे प्रतिनिधी आणि अष्टविनायक अंतर्गत कोल्हे मळ्यातील 'हॉटेल पूनम ते ओझर आणि जुन्नर' ला जाणार रस्ता या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.


यावेळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय सचिव विकास खार्गे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचेशी मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दिले व पुढील कार्यवाही करण्यास सांगितले. यावेळी अँड.राजेंद्र कोल्हे, गौतम औटी, अक्षय डोके व कोल्हे मळ्यातील रस्त्याचे बाधित शेतकरी उपस्थित होते.


त्याचप्रमाणे जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन कोल्हे मळ्यातील रस्त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले दिले असून, त्यावर मंजुरीही घेतली आहे. यावेळी बाधित शेतकऱ्यांपैकी अमित औटी, शेतकरी शिवाजीराव गायकवाड, राजेंद्र कोल्हे व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


तसेच या रस्ताच्या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यांनी सातत्याने या प्रश्नावर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले.


नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांनीही सरपंच या नात्याने शेतकऱ्यांवरोबर असून, शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून विकास नको तर त्यांना विश्वासात घेऊनच रस्ता झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठीशी गांव कारभारी म्हणून ते उभे राहिले. त्यामुळे आम्ही बाधित शेतकरी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नारायणगाव स्थानिक सरपंच योगेश पाटे यांचे आम्ही बाधित शेतकरी आभारी आहोत अशी माहिती  अँड.राजेंद्र कोल्हे यांनी दिली.


कोल्हे मळ्यातील रस्त्याचा प्रश्न सुटावा आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. मात्र काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित करून राजकारण केले जात आहे. आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जनतेच्या भल्यासाठी कोणीही अशा प्रकारे राजकारण करू नये असे आवाहन अँड राजेंद्र कोल्हे यांनी शेवटी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा