Breaking


जुन्नर : डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान


जुन्नर : डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मानयेथील डिसेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून कृषीतज्ञ डॉ. संतोष सहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील १६ माध्यमिक शाळातील दहावीच्या मार्च २०२१ मधील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकात आलेल्या ५० विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्कूल बॅग, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प व कळी उमलतना ही मार्गदर्शक पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला. 


तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या पश्चिम आदिवसी भागातील एकूण १६ विद्यार्थ्यांनींना "तात्यांचा ठोकळा" हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंढे, फोरकास्ट ॲग्रोटेकचे संचालक कृषितज्ञ डॉ. संतोष सहाणे, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, प्रकल्प समन्वयक फकिर आतार, खेडच्या रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक भाऊसाहेब कुंभार, माजी नगरसेवक अमोल गायकवाड, शिवकार्य अर्बन मल्टीपल निधीचे कार्यकरी संचालक आदिनाथ चव्हाण, जयहिंद पोलिटेक्निकचे उपप्राचार्य सुभाष आन्द्रे, शासकीय मुलींचे वसतीगृहाच्या गृहपाल अर्चना पवार, शिवमूद्रा इन्फोटेकच्या संचलिका अश्विनी दातखिळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा