Breaking
जुन्नर : दिव्यांगांचे आरक्षण रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला दिव्यांग संघटनांचा विरोध


जुन्नर : दिव्यांगांचे आरक्षण रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला दिव्यांग संघटनांनी विरोध केला आहे.


आज जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी व त्याचा विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र, पणसुंबा पेठ येथील कार्यालयात संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर यांनी दिव्यांगांच्या व्यदा जाणून घेतल्या.


या वेळी कार्याध्यक्ष दत्तात्रय हिवरेकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनिल जंगम, सौरभ  मातेले, शेख अहमद इनामदार, ज्ञानदेव बांगर, अनसार सौदागर, वसंत  काफरे, मानव अधिकार विकास संस्था चे पुणे जिल्हा  उपाध्यक्ष आरोटे, निवृती मोहरे, मिनाक्षी औटी, श्रीहरी नायकोडी, सुरेखा नवले, केशव मुकणे,  राजेंद्र ठोंगिरे, प्रहार रूग्ण सेवक पुणे जिल्हा चे स्मिता तांबे, पांडुरंग भालचिम, मंदा हाडवले, कल्याणी नवले, दिपक  ससाणे, मूकबधिर  संघटना चे  प्रविण काफरे, व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राहुल मुसळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा