Breaking


जुन्नर : माणिकडोह येथील ठाकरवस्तीत किराणा किटचे वाटप


जुन्नर : आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके, प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 'मराठी बाणा प्रतिष्ठाण' च्या माध्यमातून 'आपला भाऊ प्रतिष्ठाण' च्या सहकार्याने माणिकडोह ठाकरवस्ती येथील सर्व कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.


यावेळी युवा नेते अमित बेनके, प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, अध्यक्ष रमेश मेहेत्रे, तुळशीदास कोऱ्हाळे, मुकेश वाजगे, सागर दरांदळे, प्रशांत ब्रम्हे, विशाल भुजबळ पाटील, संतोष ढोबळे, उद्योजक वायकर, विवे पापडे, मंदार ढोबळे, अमित शेलार तसेच माणिकडोह गावचे ग्रामस्थ, तसेच मराठी बाणा प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी खामगाव चे उपसरपंच अजिंक्य घोलप म्हणाले, आत्ता पर्यंत आपला भाऊ प्रतिष्ठाण व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाडळी गणातील ५ गोर - गरीब वाड्या - वस्त्यांना अन्नधान्य किट, किराणा किट तसेच कोरोना काळात तेथील बांधवांना हॉस्पिटलची मदत, शासकीय योजनांसाठी कर्तव्यपर मदत केली आहे. दानशूर दात्यांचे मनःपूर्वक आभार !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा