Breaking


जुन्नर : उसराण येथे किसान सभेचा रोजगार मेळावा संपन्न


जुन्नर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी किसान सभा जुन्नर तालुका समितीने आज ता. ११ ऑगस्ट रोजी उसराण गावामध्ये रोजगार मेळावा घेतला.जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी गावामध्ये भात लावणी संपली की लोकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते तसेच रोजगारासाठी इतर गावामध्ये जावे लागते त्यामुळे किसान सभेने महात्मा गांधी रोजगार हमी कायद्या अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.


या मेळाव्यात मार्गदर्शक सीमा काकडे यांनी रोजगार हमी कायदा काही कृती करून सोप्या भाषेत लोकांना समोर मांडला. मनरेगा कायद्या अंतर्गत गावागावातील नवीन संसाधनाची निर्मिती होईल आणि लोकांच्या हाताला काम आणि त्या कामाचा योग्य मोबदला मिळेल हे त्यांनी समजावून सांगितले.


रोजगार हमी योजना ही महिला बचत गट आणि महिलांना आर्थिक बळ देणार आणि पुरुष आणि महिलांना समान मजुरी देणारी ही एकमेव योजना आहे. ग्रामीण भागातील गावाचा पायाभूत सुविधांचा विकास आणि गावातील माणसाला गावातच रोजगार हे माध्यम आहे असे सीमाताईनी मजुरांना मार्गदर्शन करताना सांगितले.


कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये गावागावातील लोकांच्या हाताला काम आणि दाम मिळण्यासाठी हा मेळावा घेत आहोत असे किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी सांगितले. त्यानंतर आंबे पिपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी त्याच्या गावात मनरेगाच्या माध्यमातून झालेली कामे लोकांना सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मंगेश मांडवे यांनी मार्गदर्शन केले. नारायण वायाळ यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच, रोजगार हमी योजनेचे काम मागणी अर्ज मजुरांना वाटप करून रोजगार घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली.


या मेळाव्याला रोजगार हमी कायद्याचे अभ्यासक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमाताई काकडे उपस्थित होत्या. तसेच किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉ.मंगेश मांडवे, सचिव लक्ष्मण जोशी, नारायण वायाळ, कोंडीभाऊ बांबळे, खडकुंबे, उसरान, चावंड, शिरोली पूर येथील महिला बचत गट, वृक्ष संगोपन करणारे मजूर यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा