Breaking
जुन्नर : कोपरे - मांडवे गावांसाठी २ झिंक अॅल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँककरिता निधी मंजूर !पुणे : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोपरे - मांडवे गावांसाठी २ झिंक अॅल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँककरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३६.७० लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.


'महाराष्ट्र जनभूमी' ने सर्वप्रथम कोपरे - मांडवे गावातील पाणी प्रश्नासह इतर मुलभूत सुविधांबाबतचे वृत्त दिले होते. सातत्याने लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यामुळे पाणी प्रश्न मार्ग लागणार आहे.


कोपरे, मांडवे, जांभुळशी व मुथाळणे ही जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील गावे वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे सांसद आदर्श ग्राम योजनेत कोपरे गाव दत्तक घेतल्यानंतर इथला पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. 

परंतु गतवर्षीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे निश्चितच काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निधीची उपलब्धता होण्याची शक्यता दिसताच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला, असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.


डॉ. कोल्हे म्हणाले, या पाठपुराव्याला यश मिळाल्याने जिल्हा नियोजन समितीच्या यंदाच्या वार्षिक आराखड्यातून पहिल्या टप्प्यात काठेवाडी (कोपरे) येथील झिंक अल्युम स्टील प्री फॅब्रिकेटेड मेटॅलिक टँकसाठी १७.९९ लक्ष रुपये तर शेलाचा माळ (मांडवे) येथील टँकसाठी १८.७१ लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा