Breaking
जुन्नर : शिवेचीवाडी येथे 'शेळ्यांचे लसीकरण, आजारावर उपचार व पशुपालकांना मार्गदर्शन' संपन्न !


जुन्नर : खामगाव ग्रामपंचायत मधील शिवेचीवाडी येथे पंचायत समिती जुन्नर अंतर्गत 'पशु संवर्धन विभागातील डॉक्टर्स टिमच्या' माध्यमातून 'शेळ्यांचे लसीकरण, आजारावर उपचार व पशुपालकांना मार्गदर्शन' करण्यात आले.


या वेळी पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.महेश शेजाळ, पशुधन विकास अधिकारी डॉ.डुंबरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ.मंडलिक, पर्यवेक्षक विशाल वाव्हळ व त्यांचे सहकाऱ्यांनी यावेळी योगदान दिले. वाडीमधील आजारी शेळ्यांचे लसीकरण तसेच आजार होऊ नये ह्यासाठी योग्य ते उपचार पद्धती, पशुपालकांची जबाबदारी ह्यावर डॉक्टर साहेबांनी माहिती दिली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न यावेळी समजून घेतले.

यावेळी गावचे माजी उपसरपंच गिरीधर नेहरकर, माजी सदस्य संदीप घोलप, माजीउपसरपंच राजू डुंबरे, सरपंच सुवर्णाताई जाधव, उपसरपंच अजिंक्य घोलप, संतोष नेहरकर, यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सदस्य रंजना काळे, ग्रामपंचायत सदस्य कुसुम केदारी, ग्रामपंचायत सदस्य धोंडू काळे, ग्रामपंचायत कर्मचारी निलेश घोलप, नवनाथ घोलप, ओंकार घोलप व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा