Breaking


जुन्नर : आंबोली येथून पूरग्रस्तांना मदत !


जुन्नर / रफिक शेख : आंबोली, ता. जुन्नर येथून पूरग्रस्तांना जमा करण्यात आली आहे. प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आवहानाला प्रतिसाद देत संघटनेच्या वतीने मदत जमा केली जात आहे. आंबोली येथील दिव्यांग बांधवांच्या वतीने पूरग्रस्तांना ३ पिशव्या तांदूळ देण्यात आला.


या वेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर दत्तात्रय हिवरेकर, कार्याध्यक्ष शेख अहमद इनामदार, सुनिल जंगम, आंबोली चे निवृत्ती सोनू मोहरे, लालू कावजी भालचिम, बाजीराव बुधा भालचिम हे उपस्थित होते.

जमा केलेली मदत प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र च्या वतीने लवकरच पुरग्रस्तांना पाठविली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा