Breaking


जुन्नर : हिवरे तर्फे मिन्हेर येथे आदिवासी दिन साजरा
जुन्नर : हिवरे तर्फे मिन्हेर गावामध्ये आज ९ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढून आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच बुधाजी गवारी, उपसरपंच संभाजी जावळे, ग्रा.पं.सदस्य किसन आंभेरे, ग्रामसेवक नांगरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी क्रांतिकारक यांच्या अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर गावातून वाद्यांच्या सहाय्याने मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत समोर सभा घेण्यात आली. त्यामध्ये विविध मान्यवरांनी आपले मनोगत व क्रांतिकारकांच्या जीवनावर भाषणे केली. यावेळी जनार्धन गवारी यांनी क्रांतिकारी नेत्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा