Breaking


जुन्नर : '३५० गिरणी नेमक्या कशा वाटल्या आणि साहेब तुम्ही किती नोटा छापल्या' हे बदनामीचे षड्यंत्र - अमोल लांडे


जुन्नर : '३५० गिरणी नेमक्या कशा वाटल्या आणि साहेब तुम्ही किती नोटा छापल्या' हे बदनामीचे षड्यंत्र असल्याचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचे सुपुत्र, केवाडी गावचे सरपंच अमोल लांडे यांनी म्हटले आहेत. हे बदनामीचे षड्यंत्र असल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


नुकतीच आदिवासी भागातील महिलांना शासनाच्या योजनेतून ३५० पीठ गिरणीचे वाटप करण्यात आले. या पीठ गिरणीचे वाटप जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांंनी केले असून या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. 


या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आणि एका नव्या चर्चेला उधाण आले. या मेसेजची हेडलाईन "३५० गिरणी नेमक्या कशा वाटल्या आणि साहेब तुम्ही किती नोटा छापल्या" अशी होती. 


या प्रकरणावर "महाराष्ट्र जनभूमी"शी बोलताना  जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांचे चिरंजीव सरपंच अमोल लांडे म्हणाले, "सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा असून आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. गिरणी वाटपाच्या कार्यक्रमाची चांगली प्रसिद्धी झाली आहे, वेगवेगळ्या ठिकाणचे आमदार, सभापती फोन करून कामाची स्तुती करत आहे.


निवडणुका जवळ आल्याने अशा पध्दतीने बदनामी केली जात आहे. मोठमोठे आकडे दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. वाटलेल्या सर्व गिरणी या शासकीय योजनेतून नसून आम्ही लांडे कुटुंबीयांनी काही पैसे खर्च करून यातील काही गिरणी खरेदी केलेल्या आहेत, अशा या एकूण ३५० गिरणी आहेत. खरेदी केलेल्या गिरणीच्या मोटारला सात वर्षे गॅरंटी आहे तर कटरला लाईफ लॉंग वोरंटी आहे. 


लाभार्थ्यांनी दुकानदाराला अगोदर पाच हजार दिले होते नंतर सहा हजार दिले असे एकूण अकरा हजार दुकानदाराला दिले आहेत. त्यामुळे सोळा हजार रुपये कुणीही भरलेले नाही. 


गिरणी या जवळच्या व्यक्तीला दिलेल्या नाहीत हवे तर यादी तपासा. लाभार्थी हे निम्मे लोक आदिवासी असतील तर निम्मे लोक एससी समाजाचे आहेत. जो अर्ज करेल त्याला लाभ मिळतो, यांनाच का भेटली? त्यांनाच का भेटली हा शासनाचा विषय आहे, आमच्या सहीने कोणताही आदेश येत नाही, आदेश हा संबंधित अधिकाऱ्याच्या सहीने असतो, ही योजना गोरगरीब आणि वंचितांना देण्यात आली आहे. 


हे बदनामीचे षड्यंत्र आहे. एवढे ३३ लाख रुपये भेटले असते तर आम्ही सोन्याची घरे बांधली असती. आम्ही काम करतोय, आम्ही ३५० पिठ गिरणी वाटल्या टिका टिपणी करणाऱ्यांनी एक तरी गिरण वाटा व्हॅाटसअपवर काही तरी लिहिण्यापेक्षा लोकांमधे राहुन चांगली कामे करा.


ज्या गोरगरीब महिलाना पिठ गिरणी दिल्या आहेत त्या समाधान व्यक्त करत आहेत व आमचे काही राजकीय विरोधक विनाकारण काहीही पोस्ट करून आम्हाला बदनाम करत आहेत आमचे जे उद्दिष्ट आहे, कि गरजु व वंचित घटकापर्यंत शासकीय लाभ पोहचवायचा ते काम आम्ही करीत राहणार आहे, ह्या अश्या पोस्ट तयार करणारे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यामुळे आपली पोळी भाजुन घ्यायचा प्रयत्न करत आहेत.


अधिक वाचा : 


जुन्नर : 'ती' ३५० गिरणी वाटपाची पोस्ट आणि लोकप्रतिनिधीसह लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा