Breaking
जुन्नर : इंगळून येथे रोजगार मेळावा संपन्न !


जुन्नर : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी किसान सभा जुन्नर तालुका समिती तर्फे आयोजित रोजगार मेळावा, इंगळून ( ता. जुन्नर) गावामध्ये संपन्न झाला.गावागावातील लोकांच्या हाताला काम आणि दाम मिळण्यासाठी हा मेळावा घेत आहोत  आणि तालुक्यातील 15 गावात अनेक लोकांना मनरेगाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये रोजगार निर्माण केला आहे. आता वृक्ष संगोपन साठी तालुक्यात 80 मजुरांना प्रति दिवसाची 248 रुपये मजुरी मिळते आहे म्हणजे महिना 6,448 रुपये मिळतात. त्यामुळे लोकांनी अधिक अधिक मागणी करावी आणि गावातच रोजगार मिळेल. त्यामुळे रोजगारासाठी होणारे तरुणाचे, आणि महिलांचे स्थलांतर थांबेल आणि महिलांना सर्वात सुरक्षित आणि हक्काचा रोजगार त्याच्या गावात मिळेल असे किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी सांगितले.


आंबेगाव तालुक्यातील फलोदे - सावरली गावचे माजी आदर्श सरपंच अशोक पेकारी म्हणाले, मनरेगाच्या कामांतून गावाचा सार्वांगिण विकास साधता येईल, त्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड ही कामे मनरेगातून आर्थिक सक्षमीकरण आणि सार्वजनिक विकास साधणारी आहेत.

पुढे बोलताना पेकारी म्हणाले, मनरेगा कायद्याच्या अंतर्गत गावागावातील नवीन संसाधनाची निर्मिती होईल आणि लोकांच्या हाताला काम आणि त्या कामाचा योग्य मोबदला मिळेल, हे त्यानी कायदा समजावून सांगताना सांगितले. तसेच रोजगार हमी योजना ही महिला बचत गट आणि महिलांना आर्थिक बळ देणार आणि पुरुष आणि महिलांना समान मजुरी देणारी ही एकमेव योजना असल्याचेही ते म्हणाले.


यावेळी आंबे - पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी गावामध्ये केलेल्या कामांचा आढावा मांडला. तसेच महिलांनी कामासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. कृषी विभागाचे कृषी सेवक दत्ता मडके यांनी कृषी विभागच्या मनरेगा अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक योजनांची माहिती दिली.

मनरेगा मजूर जितेंद्र डामसे म्हणाले की मला मनरेगा अंतर्गत मी गेली वर्ष भर काम करत आहे. त्या वर्षापासून मला या कामातून 60,000 हजार पेक्षा जास्त रक्कम मजूर मिळाली आहे. आपल्या भात शेतीचे वर्षभरात उत्पन्न सुध्दा नाही. तसेच विजय डामसे म्हणाले, मनरेगा अंतर्गत पडीक जमीन ही बाबूं लागवड गावातील शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.


गावागावातील महिला बचत गट प्रमुख महिला अनुसया गवळी, रंजना डामसे, चतुर्थी मेमाणे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर विरणक होते.

या महिलांनी विचार मांडत असताना असा कायदा आहे हे माहीत होता. पण कायद्याच्या अंतर्गत गावातच रोजगार मिळतो हे आजपर्यंत कुणीही सांगितले नाही. आम्ही आमच्या गावातच मनरेगा अंतर्गत काम मिळाले तर आम्ही नक्कीच करू. आणि गाव विकासात मोलाचा वाटा उचलू असे मत व्यक्त केले.


यावेळी आंबेगाव किसान सभेचे दत्ता गिरगे, किसान सभेचे जुन्नर तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी विजय डामसे, मनरेगा मजूर दिपक डामसे, जितेंद्र डामसे, रोहिदास डोळस, सोमा डामसे, विश्वनाथ डोळस तसेच रोजगार सेवक संतोष डामसे उपस्थित होते. त्याचबरोबर महिला बचत गट प्रमुख अनुसया गवळी, यमुना शेलकंदे, चतुर्थी मेमाणे, अर्चना शेळकंदे, सीता रावते, तसेण इंगळून, भिवाडे खुर्द, भिवाडे बुद्रुक, सोनावळे गावातील महिला बचत गट च्या महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा