Breaking


जुन्नर : ग्रामपंचायत खटकाळे - खैरे येथील मनरेगा अंतर्गत वृक्ष संगोपन ठरतोय तालुक्यात एक आदर्श उपक्रम


जुन्नर : जिल्हा परिषद मनरेगा विभाग आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या मनरेगा योजनेतून किसान सभेच्या लोकजागृतीमुळे जुन्नर तालुक्यातील  ग्रामपंचायत खटकाळे - खैरे येथील मनरेगा अंतर्गत वृक्ष संगोपन एक आदर्श उपक्रम ठरत आहे.


मनरेगा अंतर्गत खटकाळे - खैरे गावातील वृक्ष संगोपनाचे काम वर्षभरापासून एक आदर्श उदाहरण ठरत आहे. त्याचाच भाग म्हणून आज (दि. १३) सर्व मजुरांनी स्वखर्चाने रोजगार हमी योजनेचे शर्ट छापून घेतले. यात तेथील ग्राम रोजगार सेवक सचिन मोरे याचे मोलाचे योगदान दिले. रोजगार सेवक कसा असावा याचे हे आदर्श उदाहरण आहे.


या गावामध्ये 1600 झाडांची रोजगार हमी योजनेतून लागवड करण्यात आली आहे. ती सर्वच झाडे जगली असून ग्राम  रोजगार सेवक सचिन मोरे यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. यामध्ये मनरेगा मजूर संतोष भिका मोडक, अक्षय राजू मोडक, मीरा रामचंद्र मोडक, निलेश रामचंद्र भवारी, भागू सीताराम बोऱ्हाडे, पोपट कुशाबा केदारी, सिताराम सोनू केदारी, उज्वला आवजी झाडे हे वृक्ष  संगोपनाचे काम करत आहेत.

तसेच सरपंच शकुंतला देवका मोरे, ग्रामसेवक के. टी. साबळे, तसेच संपूर्ण मनरेगा पंचायत समिती टीम यांच्या साहाय्याने मनरेगा कामास प्रोत्साहन व मदत लाभत आहेत. यापुढे मनरेगा अंतर्गत खूप कामे घेऊन गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध करून गावचा विकास करण्याचे खटकाळे - खैरे ग्रामपंचातीचे ध्येय आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा