Breaking
जुन्नर : देवळे येथे मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी किसान सभेचा महिला बचतगटांशी संवाद !


जुन्नर : देवळे येथे मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी महिला बचताफगटांशी संवाद साधला.


यावेळी बोलताना किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, मनरेगा ही गावच्या विकासाला नवसंजीवनी देणारी योजना आहे. गाव विकासात लोकसहभाग हा महत्त्वाचा दुवा आहे, त्यामुळे महिलांनी इतरत्र श्रम करण्याऐवजी कायद्यामुळे गावातच रोजगार मिळेल. महिन्यातून २६ दिवस काम केल्यानंतर दिवसाला २४८ रुपये प्रमाणे ६ हजार ४४८ रुपये मिळतील. यातून गाव विकासाबरोबरच कुटुंबाची उन्नती होणार आहे. 


पुढे बोलताना जोशी म्हणाले, महिलांना सर्वांत सुरक्षित आणि हक्काचा रोजगार यातून मिळेल. पुरुष आणि स्री यांना समान मजूरी देणारी आणि थेट बँक खात्यात पैसे देणारी एकमेव योजना आहे. गावामध्ये मनरेगा योजनेची काटेकोर अंमलबजावणी झाली तर गाव विकास, महिला सक्षमीकरणाबरोबर महिला बचतगटांची उन्नती होईल.

यावेळी प्रास्ताविकात नवनाथ मोरे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना गाव पातळीवर काम देणारी योजना आहे. सध्या जुन्नर तालुक्यात ८० मजूर एक वर्षापासून वृक्ष संगोपनाचे काम करत आहे. लोकांनी गावात काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे.


यावेळी किसान सभेचे कोंडीभाऊ बांबळे, माजी सरपंच विठ्ठल बोऱ्हाडे, ग्राम रोजगार सेवक सचिन घुटे, राणूबाई बोऱ्हाडे, ममता शेळके, ज्योती बोऱ्हाडे, नंदाबाई बोऱ्हाडे, जयश्री बोऱ्हाडे, कल्पना बोऱ्हाडे, मंगल मुकणे, हौसाबाई घुटे, वनिता बोऱ्हाडे, उर्मिला घुटे, सिमा घुटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा