Breaking
जुन्नर : दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न, दिव्यांगांनी मांडल्या व्यथा !


जुन्नर : आज जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी व त्याचा  विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र, पणसुंबा पेठ येथील कार्यालयात संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर यांनी दिव्यांगांच्या व्यदा जाणून घेतल्या.


 यावेळी जिल्हा परिषद दिव्यांग भत्ता व दुर्धर आजार यांचे फॉर्म भरुन दिले तर भेटत नाही, संजय गांधी पेन्शन वेळेवर जमा होत नाही, ऑनलाईन प्रमाण पत्र नाहीत अशा लोकांना शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळाला नाही, जिल्हा परिषद कडून दिव्यांग लोकांना मिळ्णाऱ्या विविध योजना साहित्य मिळावेत म्हणून अर्ज माहिती लवकर मिळत नाही, दिव्यांग लोकांना रोजगार व प्रशिक्षण नाही, दिव्यांग विभक्त झालेली कुटुंब यांना रेशन कार्ड व धान्य  मिळत नाही, 


घरपट्टीत सवलत देण्यात येत नाही, एस.टी. मध्ये प्रवासात स्मार्ट कार्ड करीता एस. टी. कंन्डाक्टर अडवणू करतात, व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत  हद्दीत 200 स्क्वेअर फुट जागा मिळावी, ज्या दिव्यांग लोकांना घर नाही जागा नाही अश्या घरकुल बांधण्यासाठी  गायरान किंवा पडीक जागा विना अट मिळावी, दिव्यांग लोकांना  प्रत्येक गावात  प्रशिक्षण देऊन रोजगार सुरू करण्यात करीता व्यवसाय करण्यासाठी बॅकेत  कर्ज प्रकरण मंजूर करण्यात यावे, तसेच कोरोना काळात दिव्यांग लोकांना घरपट्टीत व नळपट्टीत माफ करावी, मुलांच्या शिक्षणात फी मध्ये माफी मिळावी, या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी दिपक चव्हाण यांनी सांगितले की लवकरच सर्व शासनाच्या विविध योजना व दिव्यांग लोकांना मिळणाऱ्या विविध साहित्य व मोफत साहित्य वाटप चा लवकरच कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.  


या वेळी कार्याध्यक्ष दत्तात्रय हिवरेकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनिल जंगम, सौरभ  मातेले, शेख अहमद इनामदार, ज्ञानदेव बांगर, अनसार सौदागर, वसंत  काफरे, मानव अधिकार विकास संस्था चे पुणे जिल्हा  उपाध्यक्ष आरोटे, निवृती मोहरे, मिनाक्षी औटी, श्रीहरी नायकोडी, सुरेखा नवले, केशव मुकणे,  राजेंद्र ठोंगिरे, प्रहार रूग्ण सेवक पुणे जिल्हा चे स्मिता तांबे, पांडुरंग भालचिम, मंदा हाडवले, कल्याणी नवले, दिपक  ससाणे, मूकबधिर  संघटना चे  प्रविण काफरे, व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राहुल मुसळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा