Breaking
जुन्नर : पोलिस ठाण्यात रक्षाबंधन साजरा


जुन्नर : अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना संस्थापक अध्यक्ष श्रीनिवासजी इंदुरकर, महाराष्ट्र राज्यध्यक्ष संजय भावसार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा किरण देशपांडे व राज्य महिला अध्यक्षा तनुजा गुळवी यांच्या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यातील जुन्नर, नारायणगाव, ओतूर व आळेफाटा पोलिस ठाण्यात रक्षाबंधन साजरा करण्यात आला.


निधनवार्ताआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन !


यावेळी संघटना हि कायम पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढत राहील याची ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली. तसेच पवित्र रक्षा बंधन सण राखी बांधून साजरा केला गेला. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे, जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव, नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देशपांडे, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधुकर पवार पोलिस अंमलदार अधिकारी उपस्थित होते.


हे पण पहा ! पुणे : 'पेसा पुरस्कार'साठी राज्यभरातून एकच प्रस्ताव, ५ टक्के अबंध निधिचा गैरवापर होतोय?


दरम्यान, पुणे जिल्हा महिला संघटक अर्चना पडवळ, जुन्नर तालुका अध्यक्षा शारदा कसबे, जुन्नर तालुका महिला कोषाध्यक्षा मनिषा कुरकुटे, कुसुम भंडारे, पुणे जिल्हासह कोषाध्यक्ष शंतनु जोशी, कोषाध्यक्षा गायत्री जोशी, वामन जोगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा