Breaking
जुन्नर : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अरविंद लंबे यांचे निधन !


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : उद्योग क्षेत्रातील पाया भक्कम करून सहकार क्षेत्रात पदार्पण करणारे स्व.तात्यासाहेब गुंजाळ या जेष्ट सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील सामाजिक कार्यकर्ते अरविंद शिवाजीराव लंबे (वय ४९) यांचे काल रविवार (दि.२२ ऑगस्ट) रोजी श्वसनाच्या विकाराने निधन झाले.


काही दिवसांपासून लंबे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सामाजिक कार्याची कास धरल्यानंतर ते प्रथम जयहिंद पतसंस्था आणि नंतर शरद सहकारी बँकेचे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. जयहिंद नॅशनल क्लब, जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव, तसेच येथील अजिंक्यतारा पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे नारायणगाव आणि शिवारातील सामाजिक, धार्मिक, कृषी, सहकार क्षेत्रातील मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यविधी पार पडला.

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, अजिंक्यतारा पतसंस्था, नारायणगाव ग्रामपंचायत, जयहिंद नॅशनल क्लब, नारायणगाव मधील विविध पतसंस्था आणि गावडे वाडी ग्रामस्थ यांच्या वतीने, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा