Breaking
जुन्नर : लोकभारती पक्षाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन !


जुन्नर / रफिक शेख : लोकभारती पक्षाच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील  बऱ्याच नागरिकांना अपात्र व आधार लिंक नाही. तसेच इतर कारणाने धान्य मिळत नाही. शिधापत्रिकेमध्ये सर्वांच्या नावाप्रमाणे धान्य मिळावे व त्यावर तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष खालिद पटेल यांनी केली.


या वेळी लोकभारती जुन्नर शहर शाखा अध्यक्ष रीनाताई राजू खरात, जुन्नर शहर उपाध्यक्ष शगुफ्ता इनामदार, अणे शाखा अध्यक्ष सचिन पवार, शिंदेवाडी ग्रामपंचायत सदस्य व शिंदेवाडी शाखा अध्यक्ष जब्बार शेख, पेमदरा शाखा अध्यक्ष गणेश गोपने, उपाध्यक्ष सचिन गोपने, अणे शाखेचे सदस्य संपत शिंदे, जुन्नर शहर कार्याध्यक्ष रफिक तकी, सदस्य सुनिता फुलपगार  व मान्यवर उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा