Breaking


जुन्नर : मनसेच्या आंदोलनाला यश !


जुन्नर / रफिक शेख : नारायणगाव एसटी स्टॅन्ड अस्वच्छता आणि सोयी - सुविधांचा अभाव याबाबत मनसेने वेळोवेळी एसटी प्रशासनाला निवेदन आणि विनंत्या केल्या होत्या. तसेच आंदोलन करुन ८ दिवसांची मुदत दिली होती.


अखेर एसटी स्टॅन्ड मधील स्वच्छता करण्यात आली असल्यामुळे मनसेने आंदोलनाला यश आल्याचे म्हटले आहे.

एसटी प्रशासनाने नारायणगाव एसटी बसस्थानक स्वच्छ करण्यास सुरुवात केलेली आहे. याबद्दल नारायणगाव एसटी प्रशासनाचे मनसेने आभार देखील व्यक्त केले आहे. आता साफसफाई झाल्यानंतर एसटी बस स्थानकात कायमस्वरूपी स्वच्छता आणावी आणि इतर सोयी सुविधा नेहमीच प्रवाश्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा