Breaking


जुन्नर : शासकीय आश्रमशाळा खटकाळे येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा !


जुन्नर : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे, ता. जुन्नर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच शकुंतला मोरे होत्या, तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी प्राचार्य ए. के. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते देवका मोरे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, एस. बी. घोळवे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक एन. एम. डोळे यांनी केले, तर आभार वी. टी. भुजबळ यांनी व्यक्त केले.


यावेळी पोलीस पाटील सुरेखा गागरे, ग्रामसेवक साबळे भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे, माजी सरपंच लता केदारी, एस. डी. ढोमसे, ए. एन. क्षीरसागर, एस. वाय. मुंढे, अधीक्षक कानडे, अधिक्षिका सोमकुवर, इतर सर्व शिक्षक आणि वर्ग चार कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाचा पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा