Breaking


जुन्नर : उर्मी फाऊंडेशन आणि महेंद्र टेक फाऊंडेशन वतीने तालुक्यातील विविध गावांत किराणा किटचे वाटप


जुन्नर : उर्मी फाऊंडेशन आणि महेंद्र टेक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबे, हातवीज, सुकाळवेढे, पिंपरवाडी, येथील ३१९ कुटुंबीयांना किराणा किट वाटप केले. कार्यक्रम प्रसंगी  महेंद्र टेक फाऊंडेशनचे श्री. इम्रान, श्री. दिवाकर, सौ. कल्पना, निलेश मस्करे, वरसुबाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दत्ता गवारी, वरसुबाई देवस्थान ट्रस्ट सचिव विठ्ठल ढेंगळे, खामगावचे उपसरपंच राजू डुंबरे, विकास उंडे, आंबे - पिंपरवाडीचे सरपंच मुकुंद घोडे, हिवरे तर्फे मिन्हेर चे सरपंच बुधाजी गवारी उपस्थित होते. या संस्थेनं मदत केल्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा