Breaking
जुन्नर : घाटघर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा !


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील घाटघर या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या नंतर वाघोबा मंदिर ते नानेघाट असे रँलीचे आयोजन करण्यात आले होते. नानेघाट येथे झेंडा फडकाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


अजित रावते म्हणाले, आदिवासी संस्कृती संवर्धन गरजेचे आहे. आपण पुढे आले पाहिजे असेही रावते म्हणाले.


यावेळी एसएफआयचे शिवाजी लोखंडे म्हणाले, आदिवासी दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु शहीद राघोजींचे बंड आणि बिरसांचे उलगुलान घेऊन लोकशाही मार्गाने उभारून अन्यायाविरुद्ध लढावे लागेल, असेही लोखंडे म्हणाले. 


यावेळी बिरसा ब्रिगेड अध्यक्ष अशोक मुकणे,    पेसा अध्यक्ष चिमा शिंगाडे, ग्रामसेवक संदिप मते, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रशांत लोखंडे  प्रविण घोलप, आरोग्य कर्मचारी श्रीमती. धुळे, ग्रामस्थ काळू लांडे, बाळू लोखंडे, संपत लांडे, बाळू लांडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा