Breaking
जुन्नर : देवळे गावात पारंपरिक नृत्य सादर करत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा !


जुन्नर : देवळे गावात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात रॅली ने झाली, आदिवासी गीतांच्या नादाने, आणि लहान मुले, तरुण, महिला, यांच्या आदिवासी पारंपरिक पेहरावाने उत्साहाचे वातावरण होते. जय हनुमान लेझिम पथक खैरे, यांच्या पथकाने आपल्या कलेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे की जय, बिरसा मुंडा अमर रहे, आदिवासी एकता जिंदाबाद अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला.


जिल्हा परिषद देवळे येथे पोवाडे, आदिवासी गिते, नृत्य, पारंपरिक जात्यावरची ओव्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन आणि संवर्धन करण्याचा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला 


यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. संजय साबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी अजिंक्य घोलप, पिलाजी मुंढे अंकुश साबळे, बाळासाहेब लांघी, नामदेव मुंढे, पेसा अध्यक्ष दिपक बोऱ्हाडे, ग्रामसेवक गाडेकर भाऊसाहेब, पोलीस पाटील देवराम घुटे, पोलीस पाटील शशिकला बोऱ्हाडे, शालेय शिक्षण समितीचे चिमा भोजने, केंद्र प्रमुख गजानन घुटे, अनंता बोऱ्हाडे, लहू बोऱ्हाडे, यंग ब्रिगेड चे अध्यक्ष धनंजय बोऱ्हाडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये यंग ब्रिगेडचा मोठे योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा