Breaking


किसान सभेच्या शिष्टमंडळाने २०२० च्या पीक विम्यासंदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले निवेदनकृषी मंत्री व पीक कंपनीशी धनंजय मुंडे चर्चा करणार - अँड.अजय बुरांडे


परळी (अशोक शेरकर) : २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सरकारकडे आग्रह करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. पिक विम्याच्या बाबतीत कृषीमंत्री व विमा कंपनीशी चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले असल्याची माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.


अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता. १६) परळी येथील चेमरी रेस्ट हाउस येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना २०२० चा पिक विमा मिळावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.


निवेदनात खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारने आग्रही भुमिका घ्यावी. विमा कंपनीस महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून विमा मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन पिक विमा मिळावा, पिक विमा योजना कंपनी धाजींनी न रहाता शेतकऱ्यांच्या हिताची रहावी अशी आग्रही मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुंडे यांच्याकडे केली. यावेळी मुंडे यांनी विमा कंपनी व राज्याचे कृषी मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी किसान सभेने केली.


यावेळी शिष्टमंडळात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मोहन लांब, जिल्हाध्यक्ष कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, कॉ. संदिपान तेलगड, कॉ. सुभाष डाके, कॉ. माउली सुरवसे, कॉ. प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा