Breaking
कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी, भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता !


जुन्नर / रफिक शेख : घाटमाथ्यावर मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पाचे अंतर्गत असलेल्या धरणांमध्ये अद्यापही पाणी साठा खूपच कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


हे पण पहा ! 'पेसा पुरस्कार'साठी राज्यभरातून एकच प्रस्ताव, ५ टक्के अबंध निधिचा गैरवापर होतोय?


कुकडी प्रकल्प अंतर्गत येडगाव 28.25 टक्के, माणिकडोह 45.45 टक्के, वडज 63.93 टक्के, पिंपळगाव जोगा 31.42 टक्के, चिल्हेवाडी 77.05 टक्के, घोड 24.82 टक्के, इतका पाणी साठा बुधवार दिनांक 25 ऑगस्ट 2021 अखेर झाला आहे. फक्त डिंभा धरणात 90.43 टक्के इतका पाणी साठा आहे.


निधनवार्ताआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन !


कुकडी प्रकल्पाचे आवर्तनावर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर सह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा सह सोलापूर जिल्ह्यातील काही भाग अवलंबून आहे. परंतु धरण क्षेत्रात ऑगस्ट महिना संपला तरीही पावसाने पाठ फिरवल्यामुळे यावर्षी आगामी काळात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हे पण पहा ! जुन्नर : मोक्काच्या दोन गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेलल्या कुविख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईलने पाठलाग करुन ठोकल्या बेड्या !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा