Breakingलोणावळा पोलिसांकडून पर्यटकांना माघारी पाठवण्यास सुरुवात


लोणावळा : स्वातंत्र्य दिन आणि इतर सुट्ट्या जोडून आल्याने पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. राज्यात पर्यटन बंदीचे आदेश कायम असताना देखील लोणावळा, खंडाळा परिसरांत पर्यटकांना शनिवारी गर्दी केलेली पाहायला मिळाली.


राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनबंदीचे आदेश लागू आहेत. तसेच शनिवारची सुट्टी, रविवारी स्वातंत्र्य दिन आणि सोमवारी पतेती अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने पर्यटक पर्यटनस्थळांकडे गर्दी करत आहेत, त्यामुळे पर्यटनस्थळांकडे निघालेल्या पर्यटकांची वाहने पोलिस नाकाबंदी करून परत पाठवत आहेत.


स्वातंत्र्य दिनापासून निर्बंध आणखी शिथिल करण्यात येणार असले, तरी ग्रामीण भागातील करोना संसर्ग कायम असल्याने पर्यटनबंदीचे जुनेच आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा