Breaking


पहा ! प्रत्यक्ष कॉलेजेस सुरु करण्याबाबत काय म्हणाले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंतमुंबई : येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत


सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक काल (दि.5) संपन्न झाली. यावेळी सामंत म्हणाले.


नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं सामंत यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा