Breaking


करोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर


मुंबई : करोना लसीकरणात उत्तर प्रदेशने पहिल्या क्रमांकाची बाजी मारली असली तरी लशीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. 


उत्तर प्रदेशने आत्तापर्यंत पाच कोटी 50 लाख 48 हजार इतके लसीकरण केले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरीकांची संख्या 86 लाख 18 हजार इतकी आहे. तर महाराष्ट्र लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत 4 कोटी 75 लाख इतके लसीकरण झाले आहे.  


मात्र दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र सर्व प्रथम असून १ कोटी 22 लाख नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.


- संपादन : आरती निगळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा