Breaking


मंचर ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात आजपासून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास सुरुवात


पुणे / रफिक शेख  : मंचर ग्रामीण उप जिल्हा रूग्णालयात  मागील कोरोना महामारी च्या काळात दिव्यांग लोकांना ऑनलाईन प्रमाण पत्र मिळण्यासाठी  तपासणी केंंद्र बंद होते. यामुळे दिव्यांग लोकांना ऑनलाईन प्रमाण पत्र नसल्याने अनेक अडचणी आल्या व शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळाला नाही. ऑनलाईन प्रमाणपत्र तपासणी केंद्र आज ( दि. ६)  पुन्हा सुरू करण्यात आले.


हे केंद्र सुरु करण्यासाठी  प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र ने  मंचर रूग्णालया चे अधीक्षक डाॅ. अंबादास देवमाने, डाॅ. डेरे  व डाॅ. महेश गुडे यांच्याशी चर्चा करून लवकर ऑनलाईन प्रमाण पत्र तपासणी सुरू करावी असे निवेदन दिले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.


आज पासून ऑनलाईन प्रमाण पत्र तपासणी सुरू केली आहे, तसेच दिव्यांग लोकांना  3ट्रायसायकल चे वाटप करण्यात आले. या वेळी जुन्नर तालुक्यातील केशव मुकणे, रविंद्र नर्हे व आंबेगाव तालुक्यातील गणेश सोनवणे यांना ट्रायसायकल चे व दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप डाॅ. अंबादास देवमाने, डाॅ. सीमा डेरे, डाॅ. महेश गुडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तसेच डाॅ. देवमाने यांनी लवकरच जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना जुन्नर येथे ऑनलाईन प्रमाण पत्र तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्राचे अध्यक्ष अरूण शेरकर, राहुल मुसळे, सुनिल जंगम, शेख अहमद इनामदार, प्रहार रूग्ण सेवक पुणे जिल्हा मीर अली, आंबेगावचे जिवन टोपे,  प्रहार क्रांति आंदोलन खेड तालुका अध्यक्षा शशिकला शिंदे, दादा रोडे, ओमकार शिंदे, विनायक शिंदे आदीसह उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा