Breaking


मोदींना शेवटचा उद्योग शेती उद्योग हा भांडवलदारांच्या ताब्यात द्यायचा आहे - कॉ. तानाजी ठोंबरे


बार्शी : मोदींना शेवटचा उद्योग शेती उद्योग भांडवलदारांच्या ताब्यात घ्यायचा आहे यासाठी मोदींची गडबड आहे. स्वतःची नावे देण्यासाठी ते काम करत आहेत. भांडवलदारांचा हस्तक म्हणून त्यांची ही भूमिका आहे, चळवळीतील काम करणाऱ्या व्यक्ती पेगासेसच्या मदतीने लक्ष ठेवणे असे आरोप कॉ. तानाजी ठोंबरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधामधील धरणे आंदोलना वेळी केले.


निवेदनामध्ये तीन कृषी कायदे रद्द करावेत, कामगार विरोधी चार लेबर कोड मागे घ्यावे, किमान वेतन २१ हजार रुपये करावे, पेन्शन सात हजार रुपये द्यावे, शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज वाटप करावे, विद्यार्थ्यांची फी माफ करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागण्या करण्यात आले आहेत.


आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ. तानाजी ठोंबरे, कॉ. ए.बी.कुलकर्णी, कॉ. लहू आगलावे, कॉ. धनाजी पवार, कॉ.भारत भोसले, कॉ. प्रवीण मस्तूद, कॉ. अनिरुद्ध नखाते, पवन आहिरे, बालाजी शितोळे, सुयश शितोळे, भारत पवार, लक्ष्मण घाडगे, रशिद इनामदार, दत्तात्रय कदम, बापू सुरवसे, बालाजी दळवी, सतिश गायकवाड, मुलांनी मुबारक, संजय पवार, सुरेश कुंभार, खंडू कोळी, प्रकाश जेपीथोर, रविंद्र लाटे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा