Breaking


मोहपाडा गाव ठरले सुरगाणा तालुक्यातील स्मार्ट ग्राम


सुरगाणा (दौलत चौधरी) : आर.आर.पाटील तालुका सुंदर गाव - स्मार्ट ग्राम- पुरस्कार योजनेत सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. सन २०१९-२० या वर्षात या योजने अंतर्गत झालेल्या तपासणीत गुणांकानुसार संपूर्ण  सुरगाणा तालुक्यातून मोहपाडा गावाची निवड करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक विभागीय आयुक्तालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र व १० लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार सिमा हिरे, मुख्य कार्यकारी आधिकारी लिना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, मोहपाडा ग्रामपंचायतच्या प्रशासक भरसट, विस्तार आधिकारी (ग्रा.पं.) के एम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा स्मार्ट ग्राम पुरस्कार हा माजी सरपंच नरेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली मोहपाडा ग्रामपंचायतने पटकावला. ग्राम स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, हगणदारी मुक्त गाव, गावात सर्व सार्वजनिक ठिकाणी एलएडी पथदिवे असे अनेक गाव स्तरावर उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी पार पाडले म्हणूनच तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे मोहपाडा गावाची प्रतिष्ठा वाढली आहे.


यासाठी ग्रामसेवक डी.टी.गावित, उपसरपंच बापु पवार, पोलीस पाटील पोपट जाधव, महात्मा गांधी तटांमुक्त समिती अध्यक्ष योगेश ठाकरे, संगणक परिचालक यशवंत गायकवाड यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा