Breaking


मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'अदानी एयरपोर्ट' चा फलक शिवसैनिकांनी हटवला !


मुंबई / रवींद्र कोल्हे : अदानी समूहाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे शेअर्स GVK कडून विकत घेतल्यामुळे त्याची मालकी अदानी यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे अदानी समुहाने छत्रपती 'शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे नाव बदलून 'अदानी विमानतळ' केले होते. यावर शिवसेनेने आक्रमक होत 'अदानी विमानतळ' चा बोर्ड काढून टाकला.छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन साभाळण्याचं कंत्राट आता 'अदानी एयरपोर्ट' या कंपनीला मिळालयं. विमानतळाचा ताबा १७ जुलै २०२१ ला अदानी समुहाला मिळाल्यानतर काही गुजराती उद्योगपती आणि गुजराती समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी संकुचीत वृत्तीच दर्शन घडवत ह्या व्यवहाराबाबत जाणिवपुर्वक गुजरातने मुंबईला टेकओव्हर केलं किंवा गुजरातने मुंबईचा ताबा मिळवला  अशा प्रकारचा प्रचार सुरू केला. हर्ष गोएंका सारखा प्रतिष्ठीत उद्योगपतीही यात मागे नव्हता. जाणीवपूर्वक मराठी माणसाला डिवचण्याचा, त्याच्या अस्मीतेवर हंल्ला करण्याचा हा प्रयत्न होता, असेही बोलले जात आहे.

'अदानी समुहाकडे' विमानतळाचा ताबा आल्यानंतर त्यांनी विमानतळाचं अधिकृत नांव "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ" असं असतानाही विमानतळ परिसरात सर्वत्र "अदानी एयरपोर्ट" असे फलक लावलेत. विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरही असाच अदानी एअरपोर्ट असा फलक लावण्यात आलाय.

मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या शिवरायांचं नाव विमानतळाला दिलं होतं.  पण या सर्व नामांतर प्रोसेसला फाट्यावर मारून आणि शिवराय व मराठी जनतेचा अनादर करून अदानी समुहाने विमानतळाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केलायं.

या प्रकाराला विरोध करत शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने अदानी व्यवस्थापनाला याबाबत याआधी समज दिली होती. परंतु त्यांनी त्याकडे सफशेल दुर्लक्ष केल्यामुळे आज भारतीय कामगार सेनेने आंदोलन करत सदर "अदानी एयरपोर्ट" च्या फलकांची मोडतोड केली.

"छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलून स्वतःचे नाव द्यावे. विमानतळाचे व्यवस्थापन आणि संचालन अदानी यांच्याकडे आहे. मात्र विमानतळाला नाव देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. या विमानतळाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' हेच राहणार. अदानी समुहाची चूक झाली असून त्यांनी व्यवस्थापन वा मालकी अदानी समुहाची असल्याचे ते लिहू शकतात पण मुख्य नाव त्यांना बदलता येणार नाही. विमानतळाचे नाव बदलल्यानंतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळेच संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अदानी समुहाने यापुढे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

1 टिप्पणी:

  1. Actually no one has right to remove the name of raja c. Shivaji Maharaj. What adani paid money for taking the care for airport and he is care taker and that doesn't mean he could remove the name of the c. S. M airport. Actually he has no remaining right to take a contract now. Sh should not be playing with the emotion of our Hindu culture and our legendary king our God raje shivaji Maharaj .

    उत्तर द्याहटवा