Breaking


आदिवासी विकास विभागात चाललेल्या गैर कारभार, राष्ट्रवादी काँग्रेसची चौकशीची मागणी


सुरगाणा / दौलत चौधरी : आदिवासी विकास विभागा अंतर्गत गैरकारभारातील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी विभाग नाशिक येथील उपआयुक्त अविनाश चव्हाण याच्याकडे निवेदनाद्वारे सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित तसेच सामाजिक कार्यकर्ते हेंमत वाघेरे यानी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभाग अंतर्गत वर्ग ४ भरती बाहयस्रोत ( आऊट सोसींग ) संस्थेकडून करण्यात येते. या प्रक्रियेमध्ये आदिवासी उमेदवारांना प्राधान्य न देता मनमानी भरती करण्यात येते, तरी आदिवासी उमेदवारांचा भरतीसाठी विचार करण्यात यावा. आदिवासी विभाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या कन्या वसतिगृह व कन्या आश्रम शाळा येथे पुरुष मुख्याध्यापक कार्यरत आहेत. तरी त्या ठिकाणी महिला गृहपाल व महिला मुख्याध्यापक यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. कन्या शाळा व मुलींचे वसतिगृह चालविण्यात येत आहेत त्या ठिकाणी अनेक शाळेमध्ये अत्याचार घडल्याच्या घटना घडल्या आहेत अशा घटना पुन्हा घडू नये, म्हणून अधिक्षीका यांचेकडील गोपनीय रजिस्टर संबंधीत विद्यार्थीनीच्या पालकांना दोन - तीन महिन्यातून दाखविण्यात यावेत. आदिवासी विकास विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची जाहिरात योग्य प्रकारे होत नाही. परिणामी आदिवासी खेडया पर्यंत योजना पोहचत नाही, म्हणून अनेक लाभार्थी योजने पासून वंचित आहेत  सन २०१८ ते २०१९ पासून आश्रम शाळांच्या भौतिक सुविधा शालेय स्तरावर पुर्ण कराव्या या कामी शासनाने एका शाळेला १५ लाख रुपये देण्यात आले, त्यामध्ये मुलभूत सुविधा पुर्ण न करता वरील रक्कमेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत गुणनियंत्रण मंडळ सा.बा. विभागा मार्फत लेखापरिक्षण करण्यात यावे व अहवाल मागवून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी. शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरगाणा येथील वसतिगृह इमारतीचे रंगकाम करणे कामी अनुदान १ ९ .४४ लाख रुपये प्राप्त झाले होते, परंतु सदरच्या कामामध्ये ठेकेदारास ९ लाख ७२ हजार अदा करण्यात आले, व काम पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. सदरचे रंगकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असून त्याबाबत गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करण्यात यावी. असे अनेक कामासाठी शासनाकडून ४७ ९ .०९ लाख निधीचे दुरुपयो झाल्याचे निदर्शनास आले आहे या कामाची विभागा अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात येऊन दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, सामाजिक कार्यकर्ते हेमंत वाघेरे, रामरावण चौरे, कारभारी कृष्णा, नामदेव बागुल, हंसराज बहिरम, आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा