Breaking
नांदेड : घरकुलच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने उद्या जिल्हा परिषदेवर आंदोलन


नांदेड : घरकुलच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने उद्या (दि.२४) जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


संपूर्ण महाराष्ट्रभर शेतमजूर युनियनच्या वतीने होणाऱ्या घरकुल, बांधकाम कामगार, शासकीय उमेद प्रकल्प बचत गटाच्या विविध प्रश्नाबद्दल जाब विचारणे, आपल्या हक्काच्या घराची मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घरकुल दिले जाईल अशी घोषणा केली पण वास्तवात मागील 6 वर्षात अशा निवडलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायतीच्या वतीने मागवून घेण्याच्या पलीकडे काहीच काम झालेलं नाही, उलट आता या निवडलेल्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कडक चाळण्या लावून हे निवडलेले लाभार्थी कसे कमी करता येतील यावरच केंद्र - राज्य सरकारचा अधिक भर असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

तसेच लोक कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला केंद्र - राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अगोदरच खीळ बसली आहे, असा आरोप विनोद गोविंदवार यांनी केला आहे.

नांदेडजिल्हातील सर्व गरजू, गरीब, वंचित ग्रामपंचायतीने निवडलेल्या लाभार्त्यांना विनाअट घरकुल मंजूर करा. बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना शासकीय घरकुल योजनेचा चालू वर्षात लाभ द्या. घरकुल योजनेच्या अनुदानात 5 लाख रुपये पर्यंत वाढ करा. भूमिहीनांना घर बांधण्यासाठी प्लॉट द्या. उमेद महिला स्वयंसहाय्यता समूहांना 10 लाख रुपये पर्यंत अनुदान द्या. उमेद अभियानातील वर्धिनींना सातत्याने फेरीचे आयोजन करून काम द्या. आयसीआरपी यांना किमान वेतन लागू करा व त्यांच्यावर गावाबाहेरील कामाचे ओझे लादू नये. ग्रामीण भागात शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि शहारातील मजुरांना राज्य रोजगार हमी योजने अंतर्गत नियमित काम आणि 600 रुपये मजुरी द्या, आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

प्रसिद्धी पत्रकावर विनोद गोविंदवार, अंकुश अंबुलगेकर, माधव देशाटवाड, सरुबाई सुर्वेसर, माणिक गोनशेटवाड, परमेश्वर कांगणे, रावसाहेब शिंदे, सूर्यकांत बडुरे, सुधाकर अंबुलगेकर, शंकर बादावाड, पंढरी देशटवाड, रामराव यामावाड यांनी नावे आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा