Breaking


नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड, शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर झनकर यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती !


नाशिक / रवींद्र कोल्हे :  नाशिक आणि ठाणे येथील 'लाचलुतपत प्रतिबंधक विभाग' यांनी नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिकक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर झनकर आठ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केल्यानंतर या लाचखोर अधिकाऱ्याच्या घराची रात्री उशिरा पर्यंत तपासणी करण्यात आली.


नाशिक आणि ठाणे लाचलुतपत विभागाने केलेल्या संयुक्त केलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली असून, डॉ.झनकर यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याची अधिकृत माहिती 'एसीबी' च्या हाती लागली आहे.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर झनकर यांना नाशिक आणि ठाणे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी जिल्हा परिषद नाशिक कार्यालयातच मंगळावर दि.१० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आठ लाख रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने यांनी रंगेहाथ अटक केली. त्या नंतर नाशिक लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने यांनी डॉ.झनकर यांच्या बंगल्याची झडती घेतली. त्यात एक धक्कादायक माहिती हाती आली. डॉ.झनकर यांच्या नावावर तीन एकर जमीन व चार फ्लॅट अशी स्थावर मिळकत असल्याचे आढळून आले आहे.


मंगळवार दि.१० ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिकक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर झनकर यांना एसीबी ने सायंकाळी ताब्यात घेतले.मात्र सायंकाळच्या सुमारास म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम आहे. त्यामुळे ACB ने डॉ.झनकर यांना बुधवारी हजर व्हा अशी हमी घेऊन घरी जाण्यास सांगितले. 


यावेळी शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शुक्रवार १३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ.झनकर यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दि.११ ऑगस्ट रोजी हजर व्हा अशा हमीवर सोडण्यात आले होते. मात्र त्या पोलिस ठाण्यात हजर झाल्याच नाहीत अटकेच्या भितीने त्या फरार झाल्या.


या कालावधीत झनकर यांच्या घराची झडती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली. तपास अधिकाऱ्यांनी SBI बँक, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक आणि PNG बँक यांचेसह इतर बँकांचे पासबुक जप्त केले. त्याचप्रमाणे तपास अधिकाऱ्यांनी वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांच्या घराचीही झडती घेतली. डॉ.वीर यांच्या नाशिक मधील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारी कल्याण असे प्रत्येकी एक या प्रमाणे चार फ्लॅट आहेत.


सिन्नर मध्ये ०.५७ गुंठे, कल्याण - मिलिंद नगर मध्ये ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० गुंठे, १३.१० गुंठे तर सिन्नर येथे ०.५६ गुंठे अशी एकूण तीन एकर स्थावर मिळकत आढळून आली. घरात चाळीस हजाराची रोख रक्कम आढळून आली असून, १ होंडा सिटी कार, एक अक्टिव्हा दुचाकी अशा दोन गाड्या आढळून आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा