Breaking


नाशिक : विविध मागण्यांना घेऊन कामगार, शेतकरी व शेतमजूरांची निदर्शने


नाशिक (ता. ३) : अखिल भारतीय ट्रेड युनियन केंद्र सिटूच्या वतीने आज (३ ऑगस्ट) रोजी विविध मागण्या घेऊन कामगार, शेतकरी व शेतमजूर यांनी निदर्शने करून मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले. 


यावेळी माकपचे माजी आमदार कॉ.जीवा पांडू गावित व सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोदी सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार व सामान्य जनतेचे हाल केले आहे. दररोज पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे भाव वाढत आहे. देशातील सार्वजनिक उद्योगांचे झपाट्याने खाजगीकरण करून बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा निर्णय मोदींनी घेतला असल्याची टीका माकपने केली.  तसेच यावेळी मोदी सरकार "चलेजाव"च्या घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. 


यावेळी जिल्हा सिटूचे अध्यक्ष कॉ.सीताराम ठोंबरे, जिल्हा सेक्रेटरी कॉ.संतोष काकडे, जिल्हा सेक्रेटरी तुकाराम सोनजे, कॉ.मोहन जाधव, कॉ.आत्माराम डावरे, बांधकाम कामगार संघटनेच्या कॉ. सिंधु शार्दुल, तसेच माथाडी युनियनचे कॉ.हिरामण तेलोरे, कॉ.निवृत्ती केदार, कॉ.नवनाथ शेळके, कॉ.संदीप दाभाडे, कॉ.बाबासाहेब वावधने, कॉ.गणेश शिंदे, यांसह विविध कंपनीतील कमिटी सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा