Breaking


८ लाख रुपयांची लाच घेताना माध्यमिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले


नाशिक / सुनिल सोनवणे : संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता ८ लाख रुपये लाच घेतल्या प्रकरणी नाशिकचे माध्यमिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी वैशाली पंकज विर यांसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


सविस्तर वृत्त असे की, संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी पंकज रमे दशपुते (प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक) यांनी नाशिकचे माध्यमिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे यांचे करिता ९ लाख रुपयांची मागणी केली त्यानंतर दि.२७ जुलै रोजी पडताळणी केली असता त्यांनी सदर कामाकरिता तडजोडी अंती ८ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करून लाचेचा पुढील व्यवहार त्यांचे गाडी चालक आरोपी ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्या सोबत करण्यास सांगितले, त्यानंतर आज (ता. १०) रोजी तक्रारदार यांच्याकडून येवले यांनी ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पल्लवी ढगे पाटील, सहसापळा अधिकारी पोलिस निरीक्षक मते तसेच पोलीस हवालदार मोरे, लोटेकर, अश्विनी राजपूत यांनी केली.


अधिक वाचा:

१७ ऑगस्टपासून ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू, काय आहेत मार्गदर्शक सूचना, वाचा !


मोठी बातमी : अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा रद्द करण्याचा हायकोर्टाचा निर्णयकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा