Breaking


भारतीय वंशाची नताशा पेरी, जगात भारी !


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : 'गिफ्टेड एज्युकेशन प्रोग्रॅम' ने जाहीर केल्याप्रमाणे भारतीय वंशाच्या नताशा पेरी ही विद्यार्थीनी जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या पंगतीत एक असल्याचे जाहीर केले आहे. जगात अमेरिका येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचं आयोजन केले जाते. या उपक्रमात शिकराला गवसणी घालणारीं नताशा अवघी ११ वर्षांची आहे. नताशा 'न्यू जर्सी येथील थेल्मा एल सँडमायर एलिमेन्ट्री स्कुल' ची विद्यार्थिनी आहे. तिने अकराव्या वर्षीच SAT, ACT त्याचप्रमाणे इतर परीक्षांना सामोरे जात उत्कृष्ट कामगिरी करून हे यश संपादन केल्याने 'गिफ्टेड एज्युकेशन प्रोग्राम' हा पुरस्कार देण्यात आला आहे. या परीक्षांचे यजमानपद जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड युथ (CTY) यांनी जगभरातील टॅलेंट सर्च मोहिमेअंतर्गत करण्यात आले होते.


पीटीआयने दिलेल्या वृत्तात नताशा पेरी हिस डुडलिंग आणि जेआर टॉलकिंन या कादंबऱ्या वाचनाची आवड आहे. जॉन हॉपकिन्स तर्फे आयोजित केलेल्या टॅलेंट सर्च स्पर्धेत ८४ देशातील १९ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी २० टक्के विद्यार्थ्यांची निवड हाय ऑनर अवॉर्ड साठी करण्यात आली होती. त्यात नताशा पेरी यांचा समावेश होता.


प्रेस ट्रस्टशी बोलतांना नताशा म्हणाली की, "माझी या पुरस्कारासाठी निवड झाल्याने अधिक चांगलं काम करून दाखविण्याची मला प्रेरणा मिळाली. यंदाच्या उन्हाळ्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत भाग घेतला तेव्हा नताशा इयत्ता पाचवीत शिकत होती. बोलणं आणि क्वांटिटेटिव्ह विभागात मध्ये नताशाला सर्वात जास्त आणि उत्कृष्ट गुण मिळाले होते. यात ९० टक्के गुण मिळाले होते. स्पर्धेतील निकषानुसार ग्रेड ८ होती.


जगभरातील हुशार विद्यार्थी शोधण्यासाठी जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंट युथ ही ग्रेडस्तरीय चाचणी परीक्षा घेते. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वास्तविक ,शैक्षणिक क्षमता समजतात. या परीक्षेत भारतीय वंशाच्या नताशा पेरी यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली. 


यजमान (आयोजक) संचालक व्हर्जिनिया रोज विद्यार्थ्यांच्या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाल्या की, आम्ही हायस्कुल कॉलेज आणि त्यापुढील शैक्षणिक क्षेत्रातील बुद्धिवान विद्यार्थ्यांना मदत करण्याची आमची सदैव तयारी आहे. भारतीय वंशाच्या नताशा ने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिर केली ही भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय वंशाचे अमेरिकेतील अनेक विद्यार्थी अनेक शैक्षणिक स्पर्धेत चुणूक दाखवितात आता नताशा चाही त्याच पंगतीत समावेश झाला आहे.


संपादन - रवींद्र कोल्हे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा